आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्ट केलेले रहाकम्युनिटी बनवास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • प्रायव्हसी
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्ट केलेले रहा

      तुमच्या जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

    • कम्युनिटी बनवा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
WhatsApp वेबडाउनलोड करा
WhatsApp ब्लॉग

प्रतिक्रिया, 2GB फाईल शेअरिंग, ५१२ ग्रुप्स

स्किन टोन निवडण्याच्या पर्यायांसह उपलब्ध असलेल्या संपूर्ण इमोजी कीबोर्डमुळे WhatsApp वरील प्रतिक्रिया अधिक सुधारत आहेत. वापरकर्त्यांना आपल्या कुटुंब आणि मित्रांशी चॅट करताना व्यक्त होण्याचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यास आम्ही उत्साहित आहोत.

आम्ही मागच्या महिन्यात WhatsApp वरील कम्युनिटीजबाबतच्या आमच्या कल्पनेबद्दल घोषणा केली होती. आता आम्ही संस्था, बिझनेसेस आणि इतर सौहार्दपूर्ण संबंध असलेल्या ग्रुप्सना सुरक्षितरीत्या संभाषण करून WhatsApp वर आपली कामे करता यावीत यासाठी कम्युनिटीजची निर्मिती करत आहोत. आम्हाला आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे आणि म्हणूनच नवनवीन फीचर्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

आम्हाला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की ॲपच्या नवीनतम आवृत्तीवर आता इमोजी प्रतिक्रिया उपलब्ध आहेत. प्रतिक्रिया गंमतीशीर आणि जलद असून त्यांच्यामुळे ग्रुप्सवरील अतिरिक्त भारदेखील कमी होतो. प्रतिक्रियांमध्ये अधिक सुधारणा आणण्यासाठी भविष्यात आम्ही अभिव्यक्तींचे अधिक विस्तृत पर्याय जोडू.

त्याचबरोबर, तुम्ही आता WhatsApp मध्ये 2GB पर्यंतच्या फाइल्स पाठवू शकता, ज्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतील. ही मर्यादा पूर्वी असलेल्या 100MB या मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे लहान बिझनेसेस आणि शालेय ग्रुप्सना एकत्रित काम करणे सुकर होईल असे आम्हाला वाटते. मोठ्या फाइल्ससाठी तुम्ही वायफायचा वापर करावा असे आम्ही सुचवतो. तुम्ही फाइल अपलोड किंवा डाउनलोड करत असताना एक काउंटर दाखविला जाईल, ज्यामुळे तुमच्या ट्रान्सफरला किती वेळ लागेल हे तुम्हाला समजेल.

चॅटमध्ये अधिक लोकांना जोडता येण्याचा पर्याय असावा अशी विनंतीदेखील आमच्याकडे सतत आल्यामुळे आम्ही आता ग्रुपमध्ये ५१२ लोक जोडण्याची क्षमता हळूहळू उपलब्ध करून देणार आहोत. खाजगी आणि सुरक्षित कम्युनिटी तयार करण्यासाठी मेहनत लागते आणि आम्हाला मनापासून असे वाटते की या विविध सुधारणांच्या मदतीने लोकांना आणि ग्रुप्सना एकमेकांच्या संपर्कात राहता येईल.

आम्हाला आशा आहे की लोकांना हे नवीन अपडेट्स आवडतील. पुढील वर्षभरात असे अनेक बदल शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

शेवटचे अपडेट: जुलै ११, २०२२

मे ५, २०२२

ट्विट कराशेअर करा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्‍लॉगस्टोरीजबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरस
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती