आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

डीफॉल्ट Disappearing Messages आणि एकापेक्षा अधिक कालावधी याबाबतीत अधिक नियंत्रण आणि गोपनीयता

खाजगीपणा राखून जगाला जोडणे हे आमचे ध्येय आहे. आपली जास्तीत जास्त संभाषणे समोरा समोर होण्याऐवजी डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे, आम्हाला जाणीव आहे की काही गोष्टीत एक वेगळीच जादू असते, जसे की, एखाद्या व्यक्तीसह समोरा समोर बसून तुमचे विचार विश्वासाने सांगणे, तो क्षण अनुभवत असताना तुम्ही दोघे खाजगीपणे जोडले जात असल्याचे माहीत असणे. प्रामाणिक आणि संवेदनशील होण्याचे तसेच संभाषण कुठेही, कधीही रेकॉर्ड आणि स्टोअर होत नसल्याचे माहीत असण्याचे स्वातंत्र्य असणे.

मेसेज किती वेळ राहावा हे ठरवणे तुमच्या हातात असणे. आपण जे काही टाइप करतो त्याची डिजिटल प्रत नकळत सोडण्याची आपल्याला सवयच झाली आहे. हे जणू आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा कायमस्वरूपी रेकॉर्ड ठेवता यावा म्हणून आपल्या अवती भवती घुटमळून नोंद ठेवणाऱ्या व्यक्ती सारखे झाले आहे. म्हणूनच आम्ही मागील वर्षी disappearing messages आणि अलीकडील फोटोज आणि व्हिडिओज एकदा पाहिल्यावर ते त्वरित नाहीसे होणारा एक मार्ग सादर केला आहे.

आमच्या वापरकर्त्यांना त्यांचे मेसेजेस आणि ते किती काळ राहतील हे नियंत्रित करण्याचे आणखी पर्याय देण्यासाठी आम्ही आज उत्सुक आहोत आणि ते पर्याय आहेत डीफॉल्ट disappearing messages आणि एकापेक्षा अधिक कालावधी.

WhatsApp वापरकर्त्यांकडे आता सर्व नवीन चॅट्ससाठी डीफॉल्टपणे disappearing messages चालू करण्याचा पर्याय असेल. पर्याय चालू केल्यावर, तुम्ही किंवा समोरील व्यक्ती एकमेकांसोबत जे काही चॅट्स सुरू कराल, ते तुम्ही निवडलेल्या कालावधीत नाहीसे होण्यासाठी सेट केले जातील. तसेच आम्ही ग्रुप चॅट तयार करताना नवीन पर्याय जोडला आहे, जो तुम्ही तयार कराल त्या ग्रुप्ससाठी चालू करू शकाल. हे नवीन फीचर पर्यायी आहे आणि यामुळे तुमचे अस्तित्त्वात असलेले कोणतेही चॅट्स बदलले किंवा हटवले जात नाहीत.

आम्ही disappearing messages साठी दोन नवीन कालावधी देखील जोडत आहोत : २४ तास आणि ९० दिवस तसेच सध्याचा ७ दिवसांचा पर्याय.

डीफॉल्ट disappearing messages चालू करणे निवडलेल्या लोकांसाठी, आम्ही तुमच्या चॅट्समध्ये एक मेसेज दाखवू ज्यामुळे लोकांना तुम्ही तो डीफॉल्ट निवडल्याचे कळेल. यावरून स्पष्ट होते की यात काहीच वैयक्तिक नाही - यापुढे WhatsApp वर प्रत्येकाशी कसा संवाद साधायचा ही तुमची निवड आहे. अर्थातच, तुम्हाला विशिष्ट संभाषण कायमस्वरूपी ठेवायचे असल्यास, चॅटवर परत स्विच करणे सोपे आहे.

एका वर्षाहून अधिक काळ कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहिल्याने एक गोष्ट अधिक स्पष्ट झाली आहे की आपल्याला समोरा समोर बोलता येत नसले तरीही, त्याचा अर्थ आपल्याला आपल्या वैयक्तिक संभाषणांच्या गोपनीयतेचा त्याग करावा लागेल असा होत नाही. आमचा विश्वास आहे की एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन सह disappearing messages हे असे दोन महत्त्वाचे फीचर्स आहेत, जे आजच्या काळात खाजगी मेसेजिंग सर्व्हिस म्हणजे काय हे निश्चित करतात आणि संभाषण करत असताना, ते समोरा समोर करत असल्याच्या भावनेच्या जवळ आणतात.

सुरुवात करण्यासाठी, तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज वर जा आणि 'डीफॉल्ट मेसेज टायमर' निवडा. तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

६ डिसेंबर, २०२१

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप