१६ जून २०२५

आज आम्ही आमच्या अपडेट्स टॅबसाठी, ज्यावर चॅनल्स आणि स्टेटस हे दोन्ही पर्याय असतात, काही नवीन फीचर्स सादर करत आहोत. हा टॅब तुमच्यासाठी WhatsApp वर काहीतरी नवीन शोधण्याचे ठिकाण बनवण्याकरिता आम्ही मागील दोन वर्षे यावर काम केले आहे आणि आता तो दररोज 1.5 अब्ज लोक वापरत आहेत. ही उत्सुकता पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे आणि आम्ही अॅडमिन्स, संस्था आणि व्यवसाय यांना WhatsApp वर वाढ करण्यात मदत करू इच्छितो.
आम्ही हे तीन मार्गांनी करणार आहोत:
ही फीचर्स तुमच्या वैयक्तिक चॅट्सपासून दूर, केवळ अपडेट्स टॅबवर दिसतील. याचा अर्थ, तुम्ही फक्त मित्र आणि जिवलगांशी चॅट करण्यासाठी WhatsApp वापरत असल्यास, तुमच्या अनुभवात कोणताही बदल होत नाही.
गोपनीयता लक्षात घेऊन बनवलेल्या जाहिराती
आम्ही WhatsApp वर इतर सर्व गोष्टी करतो त्याचप्रमाणे, ही फीचर्सदेखील आम्ही जास्तीत जास्त गोपनीयता लक्षात घेऊन बनवली आहेत. तुमचे वैयक्तिक मेसेजेस, कॉल्स आणि स्टेटस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतात, म्हणजेच कोणीही (आम्हीदेखील) ते पाहू किंवा ऐकू शकत नाही.
तुमच्यासाठी कदाचित महत्त्वाच्या असलेल्या स्टेटस किंवा चॅनल्स यामध्ये जाहिराती दाखवण्यासाठी, आम्ही तुमचा देश किंवा शहर, भाषा, तुम्ही फॉलो करत असलेली चॅनल्स आणि तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींशी कसे इंटरॅक्ट करता यासारखी मर्यादित माहिती वापरू. ज्या लोकांनी WhatsApp हे खाती केंद्र यामध्ये जोडण्याची निवड केली आहे त्यांच्यासाठी, आम्ही तुमची जाहिरात प्राधान्ये आणि तुमच्या Meta खात्यांवरील माहितीदेखील वापरू.
आम्ही कधीही तुमचा फोन नंबर जाहिरातदारांना विकणार नाही किंवा शेअर करणार नाही. तुमचे वैयक्तिक मेसेजेस, कॉल्स आणि तुम्ही असलेले ग्रुप्स यांचा तुम्हाला दिसणाऱ्या जाहिराती निर्धारित करण्यासाठी वापर केला जाणार नाही.
आम्ही अनेक वर्षांपासून तुमच्या वैयक्तिक चॅट्समध्ये अडथळा न आणणारा व्यवसाय बनवण्याच्या प्लॅनबद्दल बोलत आलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे, की अपडेट्स टॅब या नवीन फीचर्ससाठी काम करण्याचे अगदी योग्य ठिकाण आहे. सरुवात करू इच्छिणाऱ्या व्यवसाय आणि चॅनल अॅडमिन्ससाठी, हे कसे करावे याची अधिक माहिती येथे आहे.