29 जून 2026

तुमच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येते – वर्गमित्र, शेजारी किंवा तुम्ही इव्हेंटमध्ये झालेली ओळख – तेव्हा फोन नंबर शेअर करणे मोठे पाऊल असू शकते. कारण फोन नंबर वैयक्तिक असतो आणि तो तुमच्या जीवनातील अनेक भागांशी संबंधित असतो. कधीकधी तुम्हाला तुमचा नंबर न देता फक्त चॅट करायचे असते.
हे ग्रुप संभाषणांसाठीदेखील सत्य आहे. तुम्हाला फुटबॉल टीमसाठी पालक चॅटमध्ये सामील व्हायचे आहे, पण तुम्ही कधीही न भेटलेल्या लोकांना तुमचा फोन नंबर देण्यास तयार नाही.
म्हणूनच आम्ही WhatsApp साठी युझरनेम सादर करत आहोत. या आठवड्यापासून, आम्ही हे फीचर लाँच करू तेव्हा या वर्षाच्या अखेरीस वापरण्यासाठी तुम्ही युझरनेम आरक्षित करू शकता. WhatsApp वर तीन अब्जाहून अधिक लोक असल्यामुळे अनेक नावे ओव्हरलॅप होतात, म्हणूनच आम्ही आरक्षणे लवकर खुली करत आहोत, जेणेकरून प्रत्येकाला त्यांच्यासाठी महत्त्वाचे असलेले युझरनेम निवडण्याची संधी मिळेल.
बहुतांश लोकांसाठी, WhatsApp युझरनेम निवडणे हे काहीतरी युनिक असावे, जे फक्त त्या लोकांना माहीत असेल ज्यांच्याशी तुम्ही संपर्क करू इच्छिता. तुम्हाला ते निवडण्यात मदत हवी असल्यास, आमच्याकडे फक्त तुमच्यासाठी योग्य युझरनेम तयार करणारे युझरनेम जनरेटर आहे.
आम्हाला हेदेखील माहीत आहे, की काही लोक, जसे की क्रिएटर, लघु उद्योग आणि संस्था यांना ऑनलाइन प्रेझेन्स सातत्याने दाखवायचा असतो. त्यांच्यासाठी, आम्ही WhatsApp वर त्यांचे विद्यमान Instagram किंवा Facebook युझरनेम क्लेम करण्याचा पर्याय राखून ठेवला आहे.
युझरनेम ही WhatsApp ला आणखी खाजगी बनवण्याची आमची नवीनतम पायरी आहे. ब्राउझ करण्यासाठी कोणतीही डिरेक्टरी नाही आणि कोणत्याही सूचना नाहीत – लोकांना तुमच्याशी पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी तुमचे अचूक युझरनेम माहीत असणे आवश्यक असेल. तुमच्या युझरनेमद्वारे WhatsApp वर तुमच्याशी कोण संपर्क साधू शकते हे नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही ऐच्छिक युझरनेम की तयार केली आहे जी तुम्हाला मेसेज करण्यासाठी इतरांना माहीत असणे गरजेचे असेल.
आम्ही युझरनेम लाँच केल्यानंतर, तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा व्यवसायाला पहिल्यांदा मेसेज करता, तेव्हा तुम्ही तुमचे युझरनेम सक्षम केले असल्यास, त्यांना तुमचा फोन नंबर दिसणार नाही.
तुमचे ऐच्छिक युजरनेम आरक्षित करण्यासाठी WhatsApp च्या नवीनतम आवृत्तीवर फक्त काही सेकंद लागतात – सेटिंग्ज > खाते > युझरनेम वर जा.
आम्ही येत्या काही महिन्यांत हळूहळू युझरनेम रोल आउट करू आणि ती तुमच्या देशात उपलब्ध झाल्यावर तुम्हाला WhatsApp वर सूचित करू.
