६ नोव्हेंबर २०२०
भारतातील WhatsApp वापरकर्त्यांना आजपासून WhatsApp वरून पैसे पाठवता येणार आहेत. पेमेंट्सचा हा अनुभव इतका सुरक्षित असेल की, पैसे पाठवणे मेसेज पाठवण्याइतकेच सोपे वाटेल. या फीचरच्या मदतीने लोक कुटुंबीयांना सुरक्षितपणे पैसे पाठवू शकतील किंवा दूर असूनही एखादे उत्पादन विकत घेऊ शकतील आणि रोख रक्कम न देता किंवा पैसे काढण्यासाठी बँकेत जावे न लागता पेमेंट करू शकतील.
WhatsApp ने National Payments Corporation of India (NPCI - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या भागीदारीत 'पेमेंट्स' हे फीचर डिझाइन केलेले असून यामध्ये Unified Payment Interface (UPI - युनिफाइड पेमेंट इंटरफेस) चा वापर करण्यात आला आहे. ही भारतातील सर्वात पहिली रीअल-टाइम पेमेंट सिस्टीम असेल ज्यामध्ये १६० पेक्षा जास्त बँकांमधील व्यवहारांना सपोर्ट केले जाईल. भारतात आर्थिक सर्वसमावेशकता वाढीस लागावी यासाठी डिजिटल पेमेंट्सना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा वापर अधिक सुलभ करून देण्यासाठी आम्ही गेली २ वर्षं काम करत आहोत, आणि त्यामुळेच हे फीचर लॉंच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
WhatsApp वरून पैसे पाठवता यावे यासाठी भारतातील वापरकर्त्यांकडे भारतातील बॅंक खाते व डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. पैसे पाठवणारी आणि पैसे प्राप्त करणारी व्यक्ती यांच्या बॅंक खात्यांमध्ये UPI मार्फत पैशाचे ट्रान्सफर सुरू करण्याच्या सूचना WhatsApp या बॅंकांना (या बॅंकांना पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर असेही म्हणतात) पाठवते. ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, State Bank of India आणि Jio Payments Bank या भारतातील पाच अग्रगण्य बँकांबरोबर काम करताना आम्हाला आनंद होत आहे. UPI चा सपोर्ट असलेले कोणतेही ॲप वापरणाऱ्या व्यक्तीला WhatsApp वरून पैसे पाठवता येतील.
'डिजिटल अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागाचा सहभाग वाढवणे' आणि 'डिजिटल अर्थ सेवांचा लाभ मिळू न शकलेल्या सर्वसामान्य वर्गाला त्या सेवांचा लाभ घेता येणे' ही महत्त्वपूर्ण उद्दीष्ट्ये साध्य करण्यात WhatsApp आणि UPI चे युनिक आर्किटेक्चर स्थानिक संस्थांना उपयुक्त ठरू शकेल.
WhatsApp मधील सर्व फीचर्सप्रमाणे 'पेमेंट्स' या फीचरलाही सर्वोत्तम सुरक्षा आणि गोपनीयता लाभलेली आहे. त्यामुळेच, प्रत्येक पेमेंट करताना वापरकर्त्याला त्याचा स्वतःचा UPI पिन टाकावा लागणार आहे. iPhone आणि Android प्लॅटफॉर्मवर WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांना 'पेमेंट्स' हे फीचर उपलब्ध असेल.