९ एप्रिल २०२५

सतत जोडल्या जात असलेल्या फीचर्स आणि अपडेट्ससह, तुम्ही ज्याप्रकारे WhatsApp वापरू शकता त्या उपयुक्त आणि रोमांचक मार्गांबद्दलची माहिती चुकवणे सहज शक्य आहे. तुम्हाला माहिती देत राहण्यासाठी, आम्ही नियमितपणे नवीनतम अपडेट्स, टूल्स आणि सेटिंग्जबाबतचे सारांश शेअर करत राहू. तुमची संभाषणे आणि कॉल्स आणखी मजेदार बनवण्यासाठी आणि तुमचा चॅनल्सबाबतचा अनुभव सुधारण्यासाठी आजच्या सारांशामध्ये अलीकडेच सुरु झालेल्या फीचर्सचा समावेश आहे.

कुटुंब आणि मित्रांसोबतच्या खाजगी आणि एनक्रिप्ट केलेल्या चॅट्ससाठी तुमचे ठिकाण
ग्रुप चॅट्समधील ‘ऑनलाइन’ सूचक: लोक चॅट करण्यासाठी उपलब्ध आहेत की नाहीत ते तुम्हाला कळण्यात मदत होण्यासाठी, तुम्ही आता रिअल टाइममध्ये किती लोक ‘ऑनलाइन’ आहेत ते थेट ग्रुप नावाच्या खाली पाहू शकता.
ग्रुप्समधील हायलाईट पहा: तुमच्या ग्रुप चॅट नोटिफिकेशन्सना प्राधान्य देण्याचा सोपा मार्ग हवा आहे? @मेंशन्स, प्रत्युत्तरे आणि सेव्ह केलेल्या संपर्कांकडील मेसेजेससाठी नोटिफिकेशन्स मर्यादित करण्याकरिता नवीन ‘यासाठी सूचित करा’ सेटिंग वापरा आणि ‘हालाईट्स’ निवडा.
इव्हेंट अपडेट्स: ग्रुप्समध्ये इव्हेंट्स तयार करण्याव्यतिरिक्त, तुम्ही आता 1:1 संभाषणात इव्हेंट तयार करू शकता. आम्ही RSVP साठी ‘कदाचित,’ आणखी एकास आमंत्रित करा, दीर्घकालीन इव्हेंट्ससाठी समाप्ती तारीख आणि वेळ जोडा आणि चॅटमध्ये इव्हेंट पिन करा ही क्षमतादेखील जोडली आहे.
टॅप करण्यायोग्य प्रतिक्रिया: कधीकधी तुम्हाला फक्त एखाद्या व्यक्तीने बोललेल्या गोष्टीवर +1 करावेसे वाटत असते. आता तुम्ही झटपट प्रत्येकजणाच्या प्रतिक्रिया पाहू शकता आणि तुम्ही जे पाठवू इच्छिता त्यावर टॅप करू शकता.
iPhone वर डॉक्युमेंट स्कॅन करणे: iPhone वर थेट WhatsApp वरून डॉक्युमेंट स्कॅन करा आणि पाठवा. अटॅचमेंट ट्रेमधून ‘डॉक्युमेंट स्कॅन करा’ निवडा आणि स्कॅन, क्रॉप आणि दस्तऐवज सेव्ह करण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.
iPhone साठी डीफॉल्ट ॲप: नवीनतम iOS अपडेट्सद्वारे, तुमच्या iPhone वर तुम्ही WhatsApp ला तुमचा डीफॉल्ट मेसेजिंग आणि कॉलिंग ॲप यारूपातदेखील सेट करू शकता. स्विच करण्यासाठी, फक्त सेटिंग्ज > डीफॉल्ट अॅप्स यावर जा आणि WhatsApp निवडा.

नवीन कॉल्स करणे, कॉल लिंक्स शेअर करणे आणि तुमचा कॉल इतिहास व्यवस्थापित करणे हे सर्व एकाच ठिकाणी करण्यासाठी समर्पित टॅब
व्हिडिओ कॉल्स झूम इन करण्यासाठी पिंच करा: iPhone वापरकर्ते तुमचा स्वतःचा किंवा सहभागी व्यक्तीचा व्हिडिओ जवळून पाहण्यासाठी आता एखाद्या व्हिडिओ कॉलवर असताना व्हिडिओ कॉल झूम इन करण्यासाठी पिंच करू शकतात.
चॅटमधून कॉलमध्ये जोडा: सर्वात वर असलेल्या कॉल करा या चिन्हावर टॅप करून आणि ‘कॉलमध्ये जोडा’ निवडून सुरू असलेल्या 1:1 कॉलमध्ये थेट चॅट थ्रेडमधून एखाद्या व्यक्तीस जोडा.
कोणत्याही अडथळ्यांशिवाय कॉल्सचा आनंद घ्या: तुमचे व्हिडिओ कॉल्स आणखी विश्वसनीय आणि अधिक चांगल्या गुणवत्तेचे बनवण्यासाठी आम्ही आमचे तंत्रज्ञान अपग्रेड केले आहे. कॉल्स मध्येच खंडित होणे आणि व्हिडिओ थांबणे कमी करून आमच्या ऑप्टीमाइझ केलेल्या राउटिंग सिस्टीम्स उत्तम कनेक्शन पाथ शोधतात. आणि आणखी मजेदार अनुभवासाठी आमच्या सुधारित केलेल्या बॅंडविड्थ डिटेक्शनद्वारे झटपट तुमचा व्हिडिओ HD गुणवत्तेवर अपग्रेड होतो.

या टॅबमध्ये स्टेटस आणि चॅनल्स असून, तुमच्या वैयक्तिक चॅट्सपासून तो स्वतंत्र आहे
चॅनल्ससाठी व्हिडिओ टिपा: चॅट्सप्रमाणे, चॅनल अॅडमिन्स आता तात्काळ लहान व्हिडिओ (६० सेकंद किवा कमी) रेकॉर्ड आणि शेअर करू शकतात.
चॅनल्सवरील व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स: तुम्ही आता चॅनल्सवरून प्रवासात असताना ऐकू शकत नसलेल्या व्हॉइस मेसेज अपडेट्सचा लेखी सारांश मिळवू शकता.
QR कोड्स: चॅनल अॅडमिन म्हणून, तुम्ही आता युनिक QR कोड शेअर करू शकता, जो थेट तुमच्या चॅनलला लिंक करतो, यामुळे इतरांसोबत शेअर करणे आणि त्यांचे प्रेक्षक वाढवणे सोपे होते.
लवकरच आणखी नवीन फीचर्ससाठी आणि अपडेट्साठी भेट देत रहा!