आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्ट केलेले रहाकम्युनिटी बनवास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • प्रायव्हसी
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्ट केलेले रहा

      तुमच्या जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

    • कम्युनिटी बनवा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
WhatsApp वेबडाउनलोड करा
WhatsApp ब्लॉग

फेसबुक

साधारण ५ वर्षांपूर्वी आम्ही WhatsApp एक अतिशय सरळ उद्दिष्ट समोर ठेऊन स्थापन केले : एक असे उत्पादन तयार करायचे ज्याचा जगभरात सर्वजण वापर करू शकतात. दुसरे काहीही आम्हाला महत्वाचे वाटले नाही.

आज त्याच ध्येयाने वाटचाल करत असताना आम्ही फेसबुक बरोबर भागीदारी घोषित करत आहोत. हे करत असताना WhatsApp अजून विकसित आणि विस्तारित करण्यासाठी सहाय्य मिळेल तसेच मी, ब्रायन आणि टीम मधील इतरांना संदेशवहन सेवा अधिक क्रियाशील, माफक दरामध्ये आणि खाजगी ठेवता यावी यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करता येईल.

आमच्या वापरकर्त्यांना काही फरक पडेल का : काहीच नाही.

WhatsApp हे स्वायत्त राहील आणि स्वतंत्रपणे कार्य करेल. तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही असाल आणि कोणताही फोन वापरत असाल तरी तुम्ही WhatsApp वापरू शकता. आणि संभाषणांमध्ये कधीच जाहिरातींनी व्यत्यय आणला जाणार नाही. आमची मूलभूत तत्त्वे ज्यामुळे आमची कंपनी ओळखली जाते, आमचे ध्येय आणि आमचे उत्पादन यापैकी कशालाही मुरड घालायची वेळ आली असती तर ही भागीदारी झालीच नसती.

वैयक्तिक पातळीवर सांगायचे झाले तर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अशा टीमचा भाग आहोत ज्या टीमने गेल्या पाच वर्षात अशी संभाषण सेवा तयार केली आहे जी आता जगभरात ४५० होऊन अधिक वापरकर्त्यांना सपोर्ट करते आणि ज्यावर ३२० दशलक्षहून अधिक दैनिक सक्रिय वापरकर्ते आहेत. या सर्वांमुळे २१ व्या दशकातील संदेश सेवा नव्याने क्रांती झाली आहे, आणि याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे.

आमच्या टीमने नेहमीच विश्वास ठेवला आहे की महागडी शुल्के आणि अंतर या गोष्टींचा अडसर न ठेवता जगातील सर्व लोक त्यांच्या मित्रपरिवार आणि प्रियजनांशी संवाद साधू शकले पाहिजेत आणि आम्ही तो पर्यंत थांबणार नाही जोपर्यंत सर्व जण, सगळीकडे या संधीचा लाभ घेऊ शकणार नाही. आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांचे आणि आमच्या आयुष्यातील प्रत्यके व्यक्तीचे आभार मानू इच्छितो ज्या सर्वांची साथ मिळाली ज्यामुळे या विशेष प्रवासात हा पुढील अध्याय सर करणे आम्हाला शक्य झाले.

१९ फेब्रुवारी, २०१४

ट्विट कराशेअर करा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्‍लॉगस्टोरीजबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरस
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती