आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

ब्राझिलमधील लोक आणि लघुउद्योगांसाठी WhatApp वर पेमेंट्स फीचर आणत आहे

आम्हाला हे घोषित करताना अत्यंत आनंद होत आहे की, आजपासून आम्ही ब्राझिलमधील वापरकर्त्यांसाठी WhatsApp वर डिजिटल पेमेंट्स आणत आहोत. लोक त्यांचे चॅट न सोडता सुरक्षितपणे पैसे पाठवू शकतील किंवा स्थानिक व्यवसायावरून खरेदी करू शकतील.

ब्राझिलमध्ये कोट्यावधी लघुउद्योग आणि लघुतम उद्योग आहेत. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एखाद्या बिझनेसला झॅप करणे ही नित्याचीच बाब आहे. स्टोअरचा कॅटलॉग पाहण्यात आता आणखी एक गोष्टी जोडण्यात आली आहे, ग्राहक प्रॉडक्टसाठी देखील पेमेंट पाठवू शकतात. पेमेंट्स पाठवणे सोपे झाल्याने, अधिकाधिक बिझनेस डिजिटल अर्थव्यवस्थेत आणता येतील आणि वाढीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील.

याशिवाय पैसे पाठवणे मेसेज पाठवण्याइतके सोपे करून लोकांमधले शारीरिक अंतर दूर करणे हेदेखील आमचे उद्दीष्ट्य आहे. WhatsApp वरील पेमेंट्स Facebook Pay उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे या पेमेंट्ससाठी वापरत असलेली कार्ड माहिती तुम्हाला पुढे Facebook च्या इतर ॲप्ससाठी वापरता येईल अशीही सोय करण्याची आमची इच्छा आहे.

पेमेंट्स हे फीचर तयार करताना 'सुरक्षा' हा मुख्य मुद्दा विचारात घेण्यात आला असल्याने अवैध व्यवहार रोखण्यासाठी सहा अंकी खास पिन नंबर किंवा फिंगरप्रिंट आवश्यक असेल. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही Visa आणि Mastercard च्या नेटवर्कवर Banco do Brasil, Nubank आणि Sicredi च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सना सपोर्ट देऊ. यासाठी आम्ही Cielo या ब्राझिलमधील अग्रगण्य पेमेंट्स प्रोसेसर कंपनीसोबत मिळून काम करत आहोत. येत्या काळात अधिकाधिक भागीदार कंपन्यांना आमच्यासोबत काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमचे मॉडेल मुक्त स्वरूपाचे ठेवले आहे.

WhatsApp वरून पैसे पाठवणे किंवा काहीतरी खरेदी करणे हे पूर्णपणे मोफत असणार आहे. क्रेडिट कार्डावरून होणारी पेमेंट्स प्राप्त करताना बिझनेसना फी द्यावी लागते, त्या धर्तीवर या प्लॅटफॉर्मवरदेखील ग्राहकांकडून येणारी पेमेंट्स प्राप्त करण्यासाठी बिझनेसना प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.

WhatsApp वरील पेमेंट्स हे फीचर ब्राझिलमधील लोकांना आजपासून उपलब्ध होणार आहे. हे फीचर कालांतराने जगभरातील सर्व लोकांना उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.

१५ जून, २०२०

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप