४ एप्रिल, २०१९
कित्येक लघु उद्योजकांनी आमच्याकडे अनेक वेळा विचारणा केली की त्यांना त्यांच्या मनपसंत डिव्हाइस वर WhatsApp Business अॅप वापरायला आवडेल.
आता ते करू शकतात.
आज आम्ही iOS साठी WhatsApp Business अॅप आणत आहोत. Android आवृत्ती — जिचा जगभरात लाखो व्यावसायिकांनी वापर केला आहे — त्याप्रमाणेच iOS साठी WhatsApp Business अॅप हेदेखील Apple अॅप स्टोअर मधून मोफत डाउनलोड करता येईल आणि त्यामध्ये लघुउद्योजक आणि त्यांचे ग्राहक यांचा संवाद सोपा होण्यासाठीची फीचर्स उपलब्ध असतील. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल :
WhatsApp Business अॅप हे आजपासून उपलब्ध आहे आणि ते ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, भारत, मेक्सिको, लंडन आणि अमेरिका या देशांमध्ये अॅप स्टोअर वर मोफत डाउनलोड करता येईल. हे अॅप जगभरात पुढील काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होईल.
जगभरातील लघु उद्योजक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, मग ते ब्राझील मधील ऑनलाईन स्वीट शॉप असो ज्यांनी ६० टक्के विक्री WhatsApp Business मार्फत केली किंवा बंगळुरू, भारत येथे शहरातील छोट्या घरांसाठी कंपोस्ट बिन डिझाईन करणारा लघु उद्योग असो, ते अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या लांबच्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आमच्या अॅपचा वापर करतात. अजूनही लहान उद्योगांसाठी WhatsApp Business अॅप सज्ज करण्यासाठी आणि त्यांना व्यवसायात यश मिळविण्यासाठी कशी मदत झाली हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.