आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp साठी भविष्यातील विचार

आज, पुढील काही महिन्यांत बिझनेससोबत कम्युनिकेट करण्यासाठी लोकांनी नवीन मार्गांची चाचणी घेण्याच्या आमच्या योजनेचा एक भाग म्हणून या चार वर्षात पहिल्यांदाच आम्ही WhatsApp च्या अटी आणि गोपनीयता धोरण अपडेट करत आहोत. अपडेट केलेले दस्तऐवज आम्ही Facebook मध्ये सामील झाल्याचे आणि आम्ही अलीकडे अनेक नवीन फीचर उपलब्ध करून दिले असल्याचे देखील प्रतिबिंबित करतील, जसे की एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, WhatsApp कॉलिंग, आणि वेब आणि डेस्कटॉप सारखे मेसेजिंग टूल. तुम्ही येथे संपूर्ण दस्तऐवज वाचू शकता. आम्ही या अपडेटबद्दल प्रत्येकाला आमच्या ॲपच्या नवीनतम सपोर्टेड आवृत्तीवर सूचित करत आहोत, आणि तुम्हाला अपडेट केलेल्या अटी स्वीकारण्यासाठी "सहमत आहे" वर टॅप करायला सांगितले जाईल.

लोकं त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मित्रांशी आणि प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी दररोज आमचे ॲप वापरतात, आणि हे बदलत नाही. पण यावर्षीच्या सुरुवातीला आम्ही घोषित केल्यानुसार, आम्ही तुम्हाला तृतीय पक्ष बॅनर जाहिराती आणि स्पॅम याशिवाय अनुभव देताना, आम्हाला तुमच्यासाठी देखील महत्त्वाच्या असलेल्या बिझनेस सोबत कम्युनिकेट करण्यासाठीचे मार्ग एक्सप्लोर करायचे आहेत. तुमच्या बँकेकडून संभाव्य फसवणुकीच्या व्यवहाराबद्दल असो किंवा विलंब होणाऱ्या फ्लाईटबद्दलविमान कंपनीकडून सूचित करणे असो, आपल्यापैकी अनेकांना ही माहिती टेक्स्ट मेसेज आणि फोन कॉल यासह इतरत्रही मिळते. आम्हाला पुढील अनेक महिन्यांमध्ये या फीचरची चाचणी करायची आहे, पण तसे करण्यासाठी आम्हाला आमच्या अटी आणि गोपनीयता धोरण अपडेट करणे गरजेचे आहे.

आम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन उपलब्ध केलेले आहे हे स्पष्ट करण्यासाठी देखील आम्ही हे दस्तऐवज अपडेट करत आहोत. जेव्हा तुम्ही आणि ज्यांना तुम्ही मेसेज करता ते लोक WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरता, तेव्हा तुमचे मेसेजेस डीफॉल्टनुसार एनक्रिप्ट केले जातात, याचा अर्थ केवळ तेवढेच लोक ते वाचू शकतात. आम्ही पुढच्या काही महिन्यांत Facebook सह अधिक समन्वय साधत असलो तरीही, तुमचे एन्क्रिप्ट केलेले मेसेजेस खाजगी राहतात आणि इतर कोणीही ते वाचू शकत नाही. WhatsApp नाही, Facebook नाही, किंवा इतर कोणीही नाही. आम्ही Facebook सहित इतरांसोबत तुमचा WhatsApp नंबर पोस्ट किंवा शेअर करणार नाही, आणि आम्ही अजूनही तुमचा फोन नंबर जाहिरातदारांना विकणार नाही, शेअर करणार नाही किंवा देणार नाही.

पण Facebook सोबत अधिक सहयोग करून, आम्ही लोक आमच्या सर्व्हिसेस किती वेळा वापरतात याबद्दलच्या मूलभूत मेट्रिक्स ट्रॅक करण्यासारख्या आणि WhatsApp वरील स्पॅमशी सामना करण्यासारख्या गोष्टी करू शकू. आणि तुमचा फोन नंबर Facebook च्या सिस्टीमशी कनेक्ट करून, Facebook चांगले फ्रेंड सजेशन ऑफर करू शकते आणि जर तुमचे त्यावर खाते असेल तर तुम्हाला अधिक समर्पक जाहिराती दर्शवू शकते. उदाहरणार्थ, कदाचित तुम्ही कधीही न ऐकलेल्या एखाद्या कंपनीची जाहिरात न दिसता, तुम्ही आधीपासून काम करत असलेल्या कंपनीची जाहिरात तुम्हाला दिसू शकते. तुमच्या डेटाचा वापर कसा नियंत्रित करायचा यासहित अधिक तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

खाजगी कम्युनिकेशनच्या मूल्यावरील आमचा विश्वास अढळ आहे आणि तुम्हाला WhatsApp वर सर्वात जलद, सर्वात सोपा आणि सर्वात विश्वासार्ह अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नेहमीप्राणेच, आम्हाला तुमच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे आणि WhatsApp वापरण्यासाठी धन्यवाद.

२५ ऑगस्ट, २०१६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप