आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्ट केलेले रहाकम्युनिटी बनवास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • प्रायव्हसी
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्ट केलेले रहा

      तुमच्या जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

    • कम्युनिटी बनवा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
WhatsApp वेबडाउनलोड करा
WhatsApp ब्लॉग

काही महत्त्वाच्या गोष्टींचे स्पष्टीकरण

जेव्हा पासून आमची Facebook बरोबर होऊ घातलेल्या भागीदारीची घोषणा झाली आहे, तेव्हापासून आमच्या कहाणीने जे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यासाठी आम्ही अत्यन्त ऋणी आहोत. एक कंपनी म्हणून होईल तितक्या लोकांना त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि आप्तेष्टांबरोबर संपर्कात राहण्याची संधी उपलब्ध करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, मग ते कोणीही असोत व कोठेही असोत.

दुर्दैवाने, आमच्या भावी पार्टनरशिप मुळे WhatsApp च्या युझर डेटा अर्थात वापरकर्त्यांविषयीची माहिती आणि गोपनीयता याबद्दल अत्यंत चुकीची आणि गाफील माहिती फिरत आहे.

मला याबद्दल सर्व स्पष्ट सांगायला आवडेल.

कशाही पेक्षा मला तुम्हाला हे सांगायचे आहे की खाजगी संभाषणांबद्दल मी स्वतः अतिशय धोरणी आहे. माझ्यासाठी ही एक वैयक्तीक बाब आहे. माझा जन्म युक्रेन मध्ये झाला आणि मी ८० च्या दशकात USSR च्या राजवटीमध्ये मोठा झालो. त्या काळी माझ्या मनावर अतिशय खोलवर रुजलेले आठवणीतील एक वाक्य जे माझी आई फोनवर बोलताना मी वारंवार ऐकत असे ते म्हणजे : "ही फोनवर बोलण्याची गोष्ट नाही; मी प्रत्यक्ष भेटून सांगेन." आम्हाला सतत ही भीती असायची की आमची संभाषणांवर KGB चे लक्ष असू शकते आणि त्यामुळे मुक्तपणे बोलणे शक्य नसे, त्यामुळे मी किशोरवयीन असताना आम्ही अमेरिकेमध्ये आलो.

तुमच्या गोपनीयतेचा आदर करणे हे आमच्या रक्तात भिनलेले आहे आणि आम्ही WhatsApp असे तयार केलेले आहे की तुमच्या बद्दल आम्ही कमीत कमी जाणून घेऊ : तुम्ही तुमचे नाव आम्हाला सांगायची गरज नसते आणि आम्ही तुम्हाला तुमचा ई-मेल अॅड्रेस विचारत नाही. आम्हाला तुमचा वाढदिवस माहित नसतो. आम्हाला तुमच्या घराचा पत्ता देखील माहित नसतो. तुम्ही कोठे काम करता ते आम्हाला माहित नसते. आम्हाला तुमच्या आवडी माहित नसतात, तुम्ही इंटरनेट वर काय शोधले किंवा तुमचे GPS वरील स्थान माहित नसते. यापैकी कोणतीही माहिती WhatsApp तर्फे संग्रहित केली गेलेली नाही आणि ते बदलण्याचा आमचा कोणताही मानस नाही.

जर फेसबुक बरोबर पार्टनरशिप केल्याने आम्हाला आमची तत्त्वे बदलावी लागणार असतील तर आम्ही ते केलेच नसते. उलट आम्ही अशी भागीदारी स्थापित करीत आहोत ज्यामुळे आम्हाला स्वतंत्र आणि स्वायत्त राहून काम करता येईल. आमची मूळ तत्त्वे आणि विश्वास बदलणार नाही. आमचे सिद्धांत बदलणार नाहीत. ज्या सर्व गोष्टींमुळे WhatsApp एक आघाडीची खाजगी संदेश सेवा बनली त्या सर्व गोष्टी तशाच राहतील. त्याविरुद्ध परिकल्पना करणे हे केवळ आधारहीन आणि व्यर्थच नाही तर ते अतिशय बेजबाबदार वर्तन आहे. त्यामुळे लोकांना असे घाबरविण्यात येत आहे की आम्ही अचानक नवीन प्रकारची माहिती जमा करीत आहोत. हे सत्य नाही, आणि तुम्हाला हे माहिती असणे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा : Facebook बरोबर होत असलेल्या भावी पार्टनरशिपमुळे आम्ही ज्या ध्येयासाठी इथेपर्यंत आलो त्यामध्ये आम्ही कसलीही तडजोड करणार नाही. आमचे सर्व लक्ष हे WhatsApp च्या त्या लांबच्या पल्ल्यावर केंद्रित आहे ज्यामुळे संपूर्ण जगभरात लोक स्वच्छंदपणे आणि मनात कोणतीही भीती न बाळगता एकमेकांशी संवाद साधू शकतील.

१७ मार्च, २०१४

ट्विट कराशेअर करा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्‍लॉगस्टोरीजबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरस
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती