आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

आमच्या नव्या अपडेटसाठी अधिक वेळ देणे

आमच्या अलीकडील अपडेटविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या अपडेटविषयी लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे असे आमच्या लक्षात आले आहे. यामुळे खूप गैरसमज पसरलेले आहेत आणि हे चिंताजनक आहे. त्यामुळेच, आम्ही आमची तत्त्वे आणि काही तथ्ये लोकांना पुन्हा एकदा समजवून देऊ इच्छितो.

WhatsApp एका सरळसाध्या संकल्पनेवर आधारलेले आहे: तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत जे काही शेअर करता, ते फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत शेअर करता आहात ती व्यक्ती यांच्यातच खाजगी राहते. याचाच अर्थ आम्ही तुमची वैयक्तिक संभाषणे नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करतो. ही वैयक्तिक संभाषणे कोणीही, अगदी WhatsApp किंवा Facebook देखील वाचू शकत नाही. त्यामुळेच, कोण कोणाला मेसेज किंवा कॉल करते आहे याचे लॉग्स आम्ही ठेवत नाही. आम्ही तुमचे शेअर केलेले लोकेशन पाहू शकत नाही आणि आम्ही तुमचे संपर्क Facebook सोबत शेअर करत नाही.

या अपडेट्समुळे, त्यापैकी काहीही बदलत नाही. उलट या अपडेटमध्ये WhatsApp वरील एखाद्या बिझनेसला मेसेज करायचा असल्यास लोकांना वापरता येतील असे नवीन पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत, आणि ते आम्ही डेटा कसा संकलित करतो किंवा वापरतो याबद्दल आणखी स्पष्टीकरण देतात. आज जरी प्रत्येक व्यक्ती WhatsApp वरील बिझनेसवर खरेदी करत नसली तरी, भविष्यात बरेच लोक हा पर्याय वापरण्याचा विचार करू शकतील, आणि त्यामुळेच या सर्व्हिसेसविषयी लोकांना माहीत असणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. या अपडेटमुळे Facebook सह डेटा शेअर करण्याची आमची क्षमता वाढत नाही.

आम्ही आता या अटींचे पुनरावलोकन करून त्या स्वीकारण्यासाठी लोकांना दिलेली तारीख वाढवत आहोत. ८ फेब्रुवारीला कोणाचेही खाते सस्पेंड होणार नाही किंवा डिलीट केले जाणार नाही. 'WhatsApp वरील गोपनीयता आणि सुरक्षा' याविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्हाला अजून बरेच काम करायचे आहे. बिझनेसशी होणाऱ्या संभाषणांशी निगडीत नवे पर्याय १५ मे ला उपलब्ध होतील, तोपर्यंत लोकांना या अपडेटबद्दल विचार करण्याचा वेळ देण्याचे आम्ही ठरवले आहे.

WhatsApp ने जगभरातील लोकांच्या संभाषणांना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देऊ केली आणि ही सुरक्षा आम्ही आज, उद्या, केव्हाही काढून घेणार नाही. ती कायम ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या अपडेटबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी आमच्याशी संपर्क साधणाऱ्या, लोकांना तथ्ये समजावून सांगण्यात आणि त्यांचे गैरसमज दूर करण्यात मदत करणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार. WhatsApp ला खाजगी आणि वैयक्तिक संभाषणांचे सर्वोत्तम माध्यम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करू.

१५ जानेवारी २०२१

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप