आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्टेड रहाकम्युनिटी तयार करास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी तयार करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
WhatsApp वेबडाउनलोड करा
WhatsApp ब्लॉग

४०० दशलक्ष कहाण्या

काही वर्षांपूर्वी, मी आणि माझा मित्र ब्रायन याने एक मेसेजिंग सेवा केवळ एका ध्येयांतर्गत तयार केली : वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव प्रदान करणे. आम्हाला अशी खात्री होती की जर आमची इंजिनीअर्सची टीम मेसेजिंग जलद, सोपे आणि वैयक्तिक करू शकली तर कोणत्याही वैतागवाण्या जाहिरातींचे बॅनर्स, गेम प्रमोशन्स किंवा इतर सर्व विचलित करणारे "फीचर्स" यांच्यावर अवलंबून न राहता आम्ही लोकांना या सेवेसाठीच शुल्क आकारू शकतो.

आज, आम्हाला हे घोषित करताना अत्यानंद होत आहे की WhatsApp ने असा मैलाचा दगड गाठला आहे जो इतर कोणत्याही मोबाईल मेसेजिंग सेवेने गाठलेला नाही : ४०० दशलक्ष दरमहा सक्रिय वापरकर्ते, गेल्या ४ महिन्यातच जवळजवळ १०० दशलक्ष पेक्षा अधिक सदस्य सामील झाले आहेत. ही WhatsApp मध्ये केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या नाही तर ही संख्या आहे अशा लोकांची जे सक्रियपणे प्रत्येक महिन्याला ही सेवा वापरतात.

आम्ही जेव्हा असे म्हणतो की हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले, आम्ही ते अगदी मनापासून केलेले वक्तव्य आहे. WhatsApp मध्ये फक्त ५० कर्मचारी असून त्यातील अनेक जण इंजिनीअर्स आहेत. आम्ही इथेपर्यंत येणे हे मोठ्या मोठ्या जाहिरातींवर लक्ष केंद्रित न करता किंवा मोठमोठ्या मार्केटिंगची मोहीम न उभारता हे सर्व साध्य केले आहे. आम्ही अशा लोकांमुळे येथे आहोत जे लोक त्यांच्या सहकार्यांना, मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना त्यांच्या WhatsApp बद्दलच्या गोष्टी शेअर करतात - अशा गोष्टी ज्या ऐकायला आम्हाला अतीशय आवडतात.

न्यूझीलंड मध्ये एक स्त्री होती जी तिची पीएचडी पूर्ण करण्यासाठी साऊथ आफ्रिकेमध्ये स्थलांतरित झाली होती. स्वतःच्या मायदेशी परतण्याच्या एकच आठवडा अगोदर तिला तिच्या स्वप्नातील जोडीदार भेटला. जरी ते एकमेकांपासून हजारो मैल दूर होते तरी तिने आम्हाला असे सांगितले की WhatsApp मुळे त्यांना पूर्वीपेक्षाही जास्त जवळीक साधणे शक्य झाले.

युगांडा मध्ये एक सेवाभावी संस्था चालवणाऱ्या एका बिटिश महिलेकडूनही आम्ही काही ऐकले आहे. ते जी मदत तेथील मुलांना करत आहेत ते जगभरात शेअर करण्यासाठी त्या WhatsApp वापरतात ज्यायोगे त्यांच्या संस्थेला सहाय्य मिळण्यास मदत होते, त्यांनी आम्हाला असेही सांगितले की त्यांची तेथील टीम दररोज त्यांचे दैनिक रिपोर्ट्स, फोटो आणि व्हिडिओ पाठविण्यासाठी WhatsApp चा वापर करते.

भारतामधील डॉक्टर्स हार्ट अटॅकने पीडित रूग्णांचा इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम तत्परतेने पाठविण्यासाठी WhatsApp चा वापर करीत आहेत ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाचून अनेक आयुष्ये वाचविण्यासाठी मदत होत आहे. माद्रिद च्या दऱ्याखोऱ्यात हरवलेल्या गिरिरोहकांना शोधण्यासाठी देखील शोधपथकांनी WhatsApp चा वापर केला. आणि आज, जेव्हा मी युक्रेन मधील राजकीय घडामोडींचा आढावा घेतो, ती भूमी जेथे मी जन्माला आलो आणि वयाची सोळा वर्षे तेथे होतो तेव्हा न राहवून मला असेच वाटते की पुढील WhatsApp कहाणी अशी असेल ज्यात तेथील लोक ही सेवा मुक्तपणे बोलण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी उभे राहण्यासाठी करतील.

लोक कोणीही आणि कोठेही असोत, तंत्रज्ञान आणि संभाषणाद्वारे लोकांना सक्षम करणे हे WhatsApp तयार करताना आमचे ध्येय आहे. लोकांचे आयुष्य सुधारण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तसे करणे शक्य होऊ दिल्याबद्दल आभारी आहोत. आपण आपले अनुभव आमच्याशी शेअर केले यासाठी धन्यवाद आणि कृपया अजून अनुभव पाठवत रहा - तुम्ही अजून कशासाठी WhatsApp वापरत आहात हे जाणून घेण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.

१९ डिसेम्बर, २०१३

ट्विट कराशेअर करा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचर्सब्‍लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरीअर्सब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदत हवी आहे का?आमच्याशी संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण