आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्टेड रहाकम्युनिटी तयार करास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी तयार करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
WhatsApp वेबडाउनलोड करा
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर लोक आणि बिझनेस यांसाठी नवीन अनुभव तयार करणे

आज मुंबई येथील आमच्या जागतिक संभाषण इव्हेंटमध्ये आम्ही अनेक नवीन फीचर सादर करत आहोत जे WhatsApp चॅटमध्ये बिझनेससह गोष्टी वेगाने कशा पूर्ण करायच्या यात मदत करतील.

Flows सह वेगवान चॅट अनुभव

आम्ही Flows लाँच करत आहोत जेणे करून बिझनेस आणखी अनुभव ऑफर करू शकतील जसे की तुमची ट्रेनमधील सीट निवडणे, जेवण ऑर्डर करणे किंवा अपॉइंटमेंट बुक करणे - यासाठी तुमच्या चॅटमधून बाहेर पडावे लागणार नाही. Flows द्वारे, बिझनेस संपन्न मेनू आणि वेगवेगळ्या गरजांना सपोर्ट करणारे सानुकूलित स्वरूप प्रदान करू शकतील. आम्ही येत्या आठवड्यांमध्ये WhatsApp Business प्लॅटफॉर्म वापरून जगभरातील बिझनेससाठी Flow उपलब्ध करून देऊ.

तुमची पेमेंट सेवा निवडा

आम्ही थेट चॅटमध्ये खरेदी पूर्ण करणे सोपे करत आहोत. आजपासून, भारतातील लोक त्यांच्या कार्टमध्ये आयटम जोडू शकतात आणि सपोर्ट असलेले सर्व UPI ॲप्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि बऱ्याच पर्यायांद्वारे त्यांच्या आवडीची पद्धत वापरून पेमेंट पाठवू शकतात. पेमेंट करण्यासाठी Razorpay आणि PayU या भागीदारांसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे, हे मेसेज पाठवण्याइतके सोपे आहे.

WhatsApp वरील Meta Verified बिझनेस

आम्ही बिझनेससाठी Meta कडून पडताळणी प्राप्त करणे सोपे करत आहोत, यामुळे तुम्हाला तुम्ही योग्य बिझनेससोबत चॅट करत आहात हे माहीत करून घेण्यात मदत होते. Meta Verified होण्यासाठी, बिझनेस Meta ला त्यांची सत्यता प्रदर्शित करतात आणि त्या बदल्यात पडताळणी केलेला बॅज, वर्धित खाते सपोर्ट आणि तोतयागिरी पासून संरक्षण प्राप्त करतात. साइन अप करण्यात स्वारस्य असलेल्या बिझनेससाठी, Meta Verified अतिरिक्त प्रीमियम फीचरसह येईल व वेब शोधाद्वारे सहजपणे शोधता येणारे सानुकूल WhatsApp पेज तयार करण्याची क्षमता मिळेल आणि एकाधिक-डिव्हाइस सपोर्टसह अनेक कर्मचारी ग्राहकांना प्रतिसाद देऊ शकतील. भविष्यात WhatsApp Business प्लॅटफॉर्मवर बिझनेसना Meta Verified सादर करण्यापूर्वी, आम्ही WhatsApp Business ॲपचा वापर करणार्‍या छोट्या बिझनेससाठी लवकरच Meta Verified ची चाचणी सुरू करू.

बिझनेससाठी ग्राहक सेवा आणि ते लोकांना प्रदान करत असलेल्या इतर ऑफरमध्ये सुधारणा करण्यासाठी उत्कृष्ट फीचर तयार करणे सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत, आणि हे नवीन अपडेट कनेक्शन प्रस्थापित करण्यात, नातेसंबंध निर्माण करण्यात आणि बरेच काही करण्यात कशी मदत करतात हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

२० सप्टेंबर, २०२३

ट्विट कराशेअर करा

WhatsApp चॅनल जागतिक होत आहेत

आज आम्हाला 150 पेक्षा जास्त देशांमध्ये WhatsApp लॉंच करण्यात आणि तुम्हाला महत्त्वाचे असलेले अपडेट प्राप्त करण्यासाठी खाजगी मार्ग डिलिव्हर करण्यात आनंद आहे. आम्ही हजारो संस्थांचे, क्रीडा संघांचे, कलाकारांचे आणि विचारवंतांचे स्वागत करत आहोत ज्यांना लोक फॉलो करू शकतात, अगदी WhatsApp मध्ये.

जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर आमचे उद्दिष्ट सर्वातखाजगी प्रसारण सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. चॅनल तुमच्या चॅटपासून स्वतंत्र आहेत, आणि तुम्ही कोणाला फॉलो करणे निवडता ते इतर फॉलोअरना दृश्यमान नाही. अ‍ॅडमिन आणि फॉलोअर दोघांची वैयक्तिक माहिती देखील संरक्षित करतो.

आम्ही दहा देशांमध्ये आमच्या सुरुवातीपासून सर्व सकारात्मक अभिप्रायांचे कौतुक केले आहे. आम्ही जागतिक स्तरावर चॅनेलचा विस्तार करत असताना, आम्ही खालील अपडेट सादर करत आहोत:

  • वर्धित निर्देशिका - तुम्ही आता फॉलो करण्यासाठी चॅनल शोधू शकता जे तुमच्या देशाच्या आधारावर आपोआप फिल्टर केले जातात. तुम्ही फॉलोअरच्या संख्येवर आधारित नवीन, सर्वाधिक सक्रिय आणि लोकप्रिय असलेले चॅनल देखील पाहू शकता.
  • प्रतिक्रिया - अभिप्राय देण्यासाठी आणि एकूण प्रतिक्रियांची संख्या पाहण्यासाठी तुम्ही इमोजी वापरून प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ती फॉलोअरना दर्शवले जाणार नाही.
  • संपादन - लवकरच, जेव्हा आम्ही आमच्या सर्व्हरवरून ते स्वयंचलितपणे हटवतो तेव्हा अॅडमिन ३० दिवसांपर्यंत त्यांच्या अपडेटमध्ये बदल करण्यास सक्षम असतील.
  • फॉरवर्ड करणे - जेव्हाही तुम्ही चॅट्स किंवा ग्रुप्सवर अपडेट फॉरवर्ड करता तेव्हा त्यात परत चॅनलची एक लिंक समाविष्ट असेल जेणेकरून लोक अधिक जाणून घेऊ शकतील.

ही फक्त एक सुरुवात आहे, आणि आम्हाला वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या अभिप्रायांवर आधारीत आम्ही अधिक फीचर जोडणे व चॅनल विस्तारीत करणे सुरू ठेऊ. येत्या काही महिन्यात, आम्ही कोणासाठी देखील चॅनल तयार करणे शक्य करू.

जर तुम्ही थेट आमच्याकडून अधिक प्रॉडक्ट अपडेटबद्दल ऐकू इच्छित असाल, तर आता आम्ही काय बील्ड करत आहोत याबद्दल तुम्हाला अद्ययावत ठेवण्यासाठी अधिकृत WhatsApp चॅनल देखील लॉंच केले आहे.

१३ सप्टेंबर, २०२३

ट्विट कराशेअर करा

Mac साठी नवीन WhatsApp ॲप; आता ग्रुप कॉलिंगसह

या वर्षाच्या सुरूवातीला, आम्ही WhatsApp डेस्कटॉपसाठी नवीन WhatsApp अॅप सादर केले आहे, आणि Mac वापरकर्त्यांसाठी समान सुधारित अनुभव आणत आहोत.

Mac साठी नवीन WhatsApp अॅप सह, व्हिडिओ कॉलवर 8 लोकांपर्यंत आणि ऑडिओ कॉलवर 32 लोकांपर्यंत कनेक्ट करून तुम्ही आता प्रथमच तुमच्या Mac वरून ग्रुप कॉल करू शकता. आता तुम्ही ग्रुप कॉल सुरू केल्यानंतर त्यात सामील होऊ शकता, तुमचा कॉल इतिहास पाहू शकता आणि अॅप बंद असतानाही इनकमिंग कॉल सूचना प्राप्त करणे निवडू शकता.

मोठ्या स्क्रीनवर WhatsApp वापरताना तुम्हाला अधिक जलदतेने काम पूर्ण करण्यात मदत करून, Mac वापरकर्त्यांना परिचित होण्यासाठी अॅप पुन्हा डिझाइन केले आहे. आता तुम्ही चॅटमध्ये फाईल ड्रॅग आणि ड्रॉप करून सहजपणे फाईल्स शेअर करू शकता, आणि तुमचा पूर्वीचा अधिक चॅट इतिहास पाहू शकता.

जेव्हा कोणत्याही डिव्हाइसवर WhatsApp वापरले जाते, तेव्हा Mac साठी WhatsApp संपूर्ण डिव्हाइसेसवर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनच्या सुरक्षिततेसह तुमचे वैयक्तिक मेसेज आणि कॉल खाजगी ठेवते. स्वतःसाठी नवीन अॅप वापरून पहा, आता WhatsApp.com वरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि लवकरच App Store येईल.

२९ ऑगस्ट, २०२३

ट्विट कराशेअर करा

इन्स्टंट व्हिडिओ मेसेजेस सादर करत आहे

WhatsApp वरील व्हॉइस मेसेजेसने तुमचा आवाज शेअर करण्याचा एक जलद आणि सुरक्षित मार्ग देऊन लोकांची संवाद साधण्याची पद्धत बदलली आहे. आम्ही नवीन इन्स्टंट व्हिडिओ मेसेज सह हे फीचर बील्ड करण्यासाठी उत्साही आहोत. आता तुम्ही थेट चॅटमध्ये वैयक्तिक शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड आणि शेअर करू शकता.

व्हिडिओ मेसेज हे चॅटला प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते म्हणण्याचा आणि ६० सेकंद मध्ये दर्शवण्याचा वास्तवकालीन मार्ग आहे. आम्हाला वाटते व्हिडिओसह येणाऱ्या सर्व भावनांसह क्षणचित्र शेअर करणे मजेशीर असेल, मग ते एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो, विनोदावर हसणे असो किंवा आनंदाची बातमी देणे असो.

व्हिडिओ मेसेज पाठवणे हे व्हॉइस मेसेज पाठवण्याइतके सोपे आहे. व्हिडिओ मोडवर स्विच करण्यासाठी फक्त टॅप करा, आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी होल्ड करा. व्हिडिओ हॅंड्स-फ्री लॉक करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही स्वाईप अप देखील करू शकता. चॅटमध्ये उघडल्यावर व्हिडिओ म्यूटवर आपोआप प्ले होतील आणि व्हिडिओवर टॅप केल्याने आवाज सुरू होईल. तुमचे मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी व्हिडिओ मेसेज हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात.

व्हिडिओ मेसेजेस रोल आऊट होणे सुरू झाले आहे आणि आगामी आठवड्यात प्रत्‍येकजणासाठी उपलब्ध असतील.

२७ जुलै, २०२३

ट्विट कराशेअर करा

नवीन गोपनीयता फीचर्स: अज्ञात कॉलरना आणि गोपनीयता तपासणीला सायलेन्ट करा

तुमच्या मेसेजेसची गोपनीयता संरक्षित करणे ही आम्ही WhatsApp वर जे तयार करतो त्यामागील चालना असते. तुमचे कॉल आणि मेसेजेस सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित हा आधार असताना, आम्ही टॉपवर गोपनीयतेचे आणखी स्तर जोडत आहोत ज्यामध्ये आम्ही पासवर्डच्या मागे संवेदनशील चॅटचे संरक्षण करण्यासाठी अलीकडेच लाँच केलेले चॅट लॉक, एक्स्पायर होणारे मेसेजेस जे नाहीसे होतात, एकदाच पाहण्यासाठी स्क्रीनशॉट ब्लॉक करणे, आणि तुमचा ऑनलाइन प्रेझेन्स खाजगी ठेवण्याची क्षमता यांचा समावेश आहे.

आज, आम्ही या वाढत्या लिस्टमध्ये दोन नवीन अपडेट्स जोडण्यासाठी उत्सूक आहोत: अज्ञात कॉलर्स आणि गोपनीयता तपास सायलेन्ट करा, जो आता वापरकर्त्यांना उपलब्ध आहे.

अज्ञात कॉलर्सना सायलेन्ट करा तुम्हाला अधिक गोपनीयता आणि तुमच्या इनकमिंग कॉल्सवर नियंत्रण देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. वाढीव संरक्षणासाठी हे स्पॅम, घोटाळे आणि अज्ञात लोकांचे कॉल स्वयंचलितपणे बाहेर काढण्यास मदत करते. हे कॉल तुमच्या फोनवर रिंग करणार नाहीत, पण तुमच्या कॉल लिस्टमध्ये दिसतील, जर ते महत्त्वाचे असतील.

प्रसार करण्यासाठी, आम्ही प्रत्‍येकाला WhatsApp वरील संरक्षणाच्या पर्यायांबद्दल माहित असण्याची खात्री करण्यात मदत होण्यासाठी गोपनीयता तपासणी सादर करत आहोत.

हे स्टेप बाय-स्टेप-बाय फीचर तुम्हाला महत्त्वाच्या गोपनीयता सेटिंग्जमधून संरक्षणाचा योग्य स्तर निवडण्‍यात मदत करण्यासाठी मार्गदर्शन करते, सर्वकाही एकाच ठिकाणी. तुमच्‍या गोपनीयता सेटिंग्‍जमध्‍ये ‘तपासणी सुरू करा’ निवडल्‍याने तुमच्‍या मेसेजेस, कॉल आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता भक्कम करणार्‍या एकाधिक गोपनीयता स्‍तरांमधून तुम्‍हाला नेव्हिगेट केले जाईल.

आम्हाला माहित आहे की लोकांना संवाद साधण्यासाठी सुरक्षित ठिकाणाची आवश्यकता असते त्यामुळे तुमचा खाजगी संवाद सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे. हे इतके महत्त्वाचे का आहे हे कळवण्यात मदत करण्यासाठी आम्ही हा मेसेज जगभरात नवीन मार्गांनी घेत आहोत. या आठवड्यापासून, आम्ही लोकांना खाजगी मेसेजेसद्वारे एकमेकांशी सुरक्षितपणे चेक इन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत जेणेकरून मित्र आणि प्रियजनांना कळेल की त्यांच्याकडे मोकळेपणाने बोलण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे.

२० जून, २०२३

ट्विट कराशेअर करा

WhatsApp चॅनल्स सादर करत आहेत. काय महत्त्वाचे आहे हे फॉलो करण्यासाठी एक खाजगी मार्ग

आज आम्ही चॅनल्स सादर करण्यासाठी उत्सुक आहोत: थेट WhatsApp मध्‍ये लोकांकडून आणि संस्थांकडून महत्त्वाचे अपडेट्स प्राप्त करण्याचा एक सोपा, विश्वासार्ह आणि खाजगी मार्ग. आम्ही अपडेट्स नावाच्या नवीन टॅबमध्ये चॅनल बील्ड करत आहोत - जेथे तुम्ही फॉलो करण्यासाठी निवडता ते स्टेटस आणि चॅनल्स तुम्हाला आढळतील - तुमच्या कुटुंब, मित्र आणि कम्युनिटीजसोबत तुमच्या चॅटपासून स्वतंत्र.

चॅनल हे मजकूर, फोटो, व्हिडिओ, स्टिकर आणि मतचाचण्या पाठवण्यासाठी अॅडमिनकरीता असलेले वन-वे प्रसारण टूल आहे. फॉलो करण्याकरिता तुम्हाला चॅनल निवडण्यात मदत करण्यासाठी, आम्ही शोधण्यायोग्य निर्देशिका तयार करत आहोत जेथे तुम्ही तुमचे छंद, क्रीडासंघ, स्थानिक अधिकाऱ्यांकडील अपडेट्स आणि बरेच काही शोधू शकता. तुम्ही चॅट, ईमेल किंवा ऑनलाइन पोस्ट केलेल्या आमंत्रण लिंकवरून देखील चॅनलवर जाऊ शकता.

आम्ही सर्वात खाजगी प्रसारण सेवा उपलब्ध करून देण्याची मनिषा बाळगतो. हे अॅडमिन्स आणि फॉलोअर्स दोन्हींची वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्याद्वारे सुरू होते. चॅनल अॅडमिन म्हणून, तुमचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो फॉलोअर्सना दाखवला जाणार नाही. त्याचप्रमाणे, चॅनल फॉलो करण्याने तुमचा फोन नंबर अॅडमिन किंवा इतर फॉलोअर्सना उघड केले जाणार नाही. तुम्ही कोणाला फॉलो करायचे ही तुमची निवड आहे आणि ती खाजगी असेल.

आम्ही मेसेजिंग कसे तयार करतो त्याप्रमाणेच, चॅनल अपडेट्स कायमस्वरूपी टिकून राहावेत यावर आमचा विश्वास नाही. त्यामुले आम्ही केवळ चॅनल इतिहास आमच्या सर्व्हरवर सुमारे ३० दिवसांसाठी स्टोअर करू आणि फॉलोअरच्या डिव्हाइसवरून अपडेट्स अधिक जलदतेने नाहीसे होण्यासाठी आम्ही मार्ग जोडू. अॅडमिनना देखील त्यांच्या चॅनलवरून स्क्रीनशॉट आणि फॉरवर्ड ब्लॉक करण्यासाठीचा पर्याय असेल.

शेवटी, आम्ही अॅडमिन्सना त्यांचे चॅनल कोण फॉलो करू शकते आणि निर्देशिकेमध्ये त्यांचे चॅनल शोधण्यायोग्य असावे किंवा असू नये हे ठरवणे शक्य करू. विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हे चॅनलचे उद्दिष्ट असताना, डिफॉल्टनुसार चॅनल एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित नाहीत. आम्हाला वाटते काही बाबतीत मर्यादित प्रेक्षकांकरिता एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले चॅनल असणे अर्थपूर्ण असू शकते जसे की ना नफा किंवा आरोग्य संस्था, आणि आम्ही हे भविष्यातील पर्याय म्हणून देखील एक्सप्लोर करत आहोत.

चॅनल सुरू करण्यासाठी, आम्ही कोलंबिया आणि सिंगापूरमधील अग्रगण्य जागतिक व्हॉइसेससह आणि निवडक संस्थांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत, जिथे चॅनल अनुभव बील्ड करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि अनुकूल करण्यासाठी प्रथम उपलब्ध असतील. आम्ही आणखीन देशांमध्ये चॅनल घेऊन येऊ आणि येत्या काही महिन्यांत कोणासाठीही चॅनल तयार करण्याची क्षमता निर्माण करू.

आमचा असा देखील विश्वास आहे की अॅडमिनना त्यांच्या चॅनलभोवती बिझनेस निर्माण करण्यासाठी आमच्या विस्तारित पेमेंट सर्व्हिसचा वापर करून तसेच जागरूकता वाढवण्यात मदत करण्यासाठी निर्देशिकेतील विशिष्ट चॅनल प्रमोट करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी सपोर्ट करण्याकरिता एक संधी आहे.

स्वाभाविकपणे, लोक WhatsApp कसे वापरतात याचा गाभा हा मित्र, कुटुंब आणि कम्युनिटीजमध्ये खाजगी मेसेजिंग चालू राहिल आणि ते नेहमीच आमचे पहिले प्राधान्य असेल. चॅनल तयार करणे ही आमच्या वापरकर्त्यांनी आम्हाला अनेक वर्षांपासून घेण्‍यास सांगितलेली एक मोठी स्टेप आहे. आम्हाला वाटते अखेर सोपे, विश्वसनीय आणि खाजगी प्रसारण टूल सादर करण्याची ही योग्य वेळ आहे आणि आम्हाला आशा आहे येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत ते वापरण्याचा तुम्ही आनंद घ्याल.

८ जून, २०२३

ट्विट कराशेअर करा

आता तुम्ही तुमचे WhatsApp मेसेजेस संपादित करू शकता

तुम्ही चूक करता त्यावेळी किंवा तुमचा विचार बदलतो त्यावेळी, तुम्ही आता तुमचे पाठवलेले मेसेजेस संपादित करू शकता.

एक क्षुल्लक शब्दलेखनातील चूक दुरूस्त करण्‍यापासून ते मेसेजमध्‍ये अतिरिक्त संदर्भ जोडण्‍यापर्यंत, आम्ही तुम्हाला तुमच्या चॅटवर आणखी नियंत्रण देण्‍यास उत्सुक आहोत. तुम्हाला केवळ पाठवलेल्या मेसेजवर दीर्घ काळ दाबून ठेवावे लागेल आणि सुमारे पंधरा मिनिटांनंतर मेनूमधून ‘संपादित करा’निवडावे लागेल.

संपादित केलेले मेसेजेस त्यांच्या बाजूला असलेले ‘संपादित केले’ दर्शवतील, त्यामुळे तुम्ही ज्यांना मेसेज पाठवता त्यांना दुरस्तीबद्दल कळेल परंतु संपादन इतिहास दिसणार नाही. सर्व वैयक्तिक मेसेजेससह, मीडिया आणि कॉल्‍स, तुमचे मेसेजेस आणि तुम्ही करता ती संपादने एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जातात.

हे फीचर जगभरातील वापरकर्त्यांसाठी आणण्‍यास प्रारंभ झाला आहे आणि ते प्रत्येकजणासाठी येणार्‍या आठवड्यांमध्‍ये उपलब्ध होईल.

२२ मे, २०२३

ट्विट कराशेअर करा

चॅट लॉक: तुमची सर्वाधिक अंतरंग संभाषणे अगदी अधिक खाजगी करणे

तुमचे मेसेजेस खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधून देणे हे आमचे पॅशन आहे. आज, आम्‍ही तुमच्‍यासाठी चॅट लॉक नावाचे एक नवीन वैशिष्‍ट्‍य आणण्‍यास उत्‍साहित आहोत, जे तुम्‍हाला तुमच्‍या सर्वाधिक अंतरंग संभाषणांना अधिक सुरक्षिततेच्या पातळीने संरक्षित करू देते.

चॅट लॉक केल्याने तो थ्रेड इनबॉक्समधून बाहेर काढला जातो आणि तो त्याच्या स्वतःच्या फोल्डरच्या मागे ठेवतो ज्यामध्ये फक्त तुमच्या डिव्हाइस पासवर्डने किंवा फिंगरप्रिंट सारख्या बायोमेट्रिकद्वारे ॲक्सेस केला जाऊ शकतो. ते त्या चॅटचे कंटेन्ट नोटिफिकेशन्समध्ये देखील स्वयंचलितपणे लपवते.

आम्हाला असे वाटते की ज्या लोकांकडे वेळोवेळी त्यांचे फोन कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करण्याचे कारण असते किंवा ज्या क्षणी खास चॅट येणार असते अगदी त्याच क्षणी तुमचा फोन अन्य एखाद्या व्यक्तीकडे असतो त्यावेळी हे फीचर अत्यंत उपयुक्त असेल. तुम्ही वन-टू-वन किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करून आणि लॉक पर्याय निवडून चॅट लॉक करू शकता. हे चॅट उघड करण्यासाठी, हळू हळू तुमचा इनबॉक्स खाली औढा आणि तुमचा पासवर्ड किंवा बाोमेट्रिक एंटर करा.

पुढील काही महिन्यांमध्ये आम्ही चॅट लॉकसाठी अधिक पर्याय जोडणार आहोत, यामध्ये सहयोगी डिव्हाइससाठी लॉक करणे आणि तुमच्या चॅट्‍ससाठी सानुकूल पासवर्ड तयार करणे समाविष्‍ट आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या फोनसाठी वापरत असलेल्या पासवर्ड पेक्षा भिन्न युनिक पासवर्ड वापरू शकता.

तुमच्या मित्रांना चॅट लॉकबद्दल सांगा, जे आता प्रारंभ होत आहे.

१५ मे, २०२३

ट्विट कराशेअर करा

मतचाचण्यांबाबत आणि WhatsApp वर मथळ्यांसह शेअर करण्याबाबत नवीन अपडेट्स

आम्ही अॅपमध्ये नावीन्य आणणे सुरू ठेवताना, आज आम्ही WhatsApp वर येणारे अनेक नवीन फीचर्स शेअर करत आहोत ज्याबद्दल आम्हाला आशा आहे की त्यामुळे चॅट्‍स थोडे अधिक प्रोडक्टिव्ह आणि मजेशीर बनतील.

मतचाचण्यांवरील नवीन अपडेट्स

ग्रुपना माहिती एकत्रित करण्यासाठी आणि एकत्रित निर्णय घेण्यात मदत करण्‍यासाठी आम्ही मतचाचण्यांकरिता तीन नवीन अपडेट सादर करत आहोत.

  • एकल-मत मतचाचण्या तयार करा: जेव्हा तुम्हाला निश्चित उत्तर हवे असेल तेव्हा, आम्ही मतचाचणी निर्मात्यांसाठी लोकांना फक्त एकदाच मतदान करण्याची अनुमती देण्याचा पर्याय सादर करत आहोत. मतचाचणी तयार करताना 'एकाहून अधिक उत्तरांना अनुमती द्या' फक्त बंद करा.
  • तुमच्या चॅट्‍समध्ये मतचाचण्या शोधा: मतचाचणीला तात्काळ उत्तर देणे नेहमीच शक्य नसते, आणि नंतर चॅटमध्ये मतचाचणी शोधणे कठीण होऊ शकते. आता, तुम्ही मतचाचण्यांनुसार मेसेजेस फिल्टर करू शकता, अगदी तसेच जसे तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा लिंकसाठी करू शकता. 'चॅट्‍स' स्‍क्रीनवर, सर्व परिणामांची लिस्ट शोधण्यासाठी 'शोधा' आणि त्यानंतर 'मतचाचण्या' दाबा.
  • मतचाचण्यांच्या परिणामांबाबत अपडेटेड रहा: लोकांनी तुमच्या मतचाचण्यांवर मत दिल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होतील, म्हणजे तुम्ही सहज प्रतिसादांवर अपटूडेट राहू शकता.

मथळ्यांसह फॉरवर्ड करणे

WhatsApp वर फोटो शेअर करणे हा मित्र आणि कुटुंबाला तुमच्या जीवनाबद्दल अपडेटेड ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि मीडियावर फॉरवर्ड करण्याच्या क्षमता म्हणजे तुम्ही एका कनेक्शनच्या ग्रुपवरील इमेज दुसऱ्यामध्ये जलद पुन्हा शेअर करू शकता. पण कधीकधी तुमच्याकडे एखाद्याने प्रतिसाद देण्यापूर्वी संदर्भ जोडण्यासाठी कदाचित वेळ नसू शकतो.

आता तुम्ही मथळा असलेला मीडिया फॉरवर्ड करता, तेव्हा तुमच्याकडे चॅट दरम्यान फोटो शेअर करताना अतिरिक्त माहिती देण्यासाठी तो ठेवण्याचा, हटवण्याचा किंवा पूर्णपणे पुन्हा लिहिण्याचा पर्याय असतो. तुम्ही फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करता तेव्हा तुम्ही त्यावर मथळा देखील जोडू शकता.

मथळ्यांसह डॉक्युमेंट शेअर करणे

इमेज किंवा व्हिडिओ शेअर करण्याप्रमाणे, तुम्ही शेअर करत असलेल्या डॉक्युमेंटना थोड्या स्पष्टीकरणाची गरज असू शकते. वर्तमानपत्रातील लेख पाठवणे असो किंला कार्य डॉक्युमेंट पाठवणे असो, आता तुमच्याकडे शेअर करण्यापूर्वी मथळा जोडण्याचा पर्याय आहे.

हे अपडेट जगभरातील युजरसाठी आणले जात आहेत आणि ते येणार्‍या आठवड्यांमध्‍ये प्रत्येकजणासाठी उपलब्ध असतील.

४ मे, २०२३

ट्विट कराशेअर करा
पुढील पेज
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचर्सब्‍लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरीअर्सब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदत हवी आहे का?आमच्याशी संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण