फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वरील शॉपिंग, पेमेंट्स आणि ग्राहक सेवा

मागील काही वर्षांमध्ये वैयक्तिक पातळीवरील संभाषणांसाठी मेसेजिंग ॲप्सचा वापर करण्यास पसंती मिळत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे आणि बिझनेस करण्याकरिताही लोक जास्तीत जास्त प्रमाणात WhatsApp चा वापर करू लागले आहेत.

लोक आणि बिझनेस यांच्यामधील संभाषण ज्या पद्धतींनी व्हायचे त्या पद्धतीही आता जुन्या झाल्या आहेत. फोन कॉल्स, ईमेल्स आणि एसएमएस यांसारख्या नवीन संभाषण माध्यमांच्या व्यवस्थापनावर बिझनेसेस वर्षभरात अब्जावधी डॉलर्स खर्च करत असले तरी लोकांना अजूनही त्यांचा कॉल होल्डवर ठेवला जाणे, कॉल एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास केला जाणे किंवा बिझनेसला पाठवलेला मेसेज व्यवस्थित पोहोचला आहे का यावर विचार करत राहणे रुचत नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

जागतिक स्तरावरील साथीच्या काळात तर बिझनेसना त्यांच्या ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी आणि प्रॉडक्ट्सची विक्री करण्यासाठी वेगवान व कार्यक्षम संभाषण पद्धतींची अधिक गरज वाटू लागली आहे. आणि अशा काळात WhatsApp ने त्यांच्यासाठी संभाषणाचा एक साधासोपा आणि सोयिस्कर मार्ग खुला करून दिला आहे. दररोज १७.५ कोटी लोक WhatsApp Business खात्यांना मेसेजेस पाठवतात. लोकांना प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी मदत हवी असेल तर ते बिझनेसला मेसेज करण्यास प्राधान्य देतात आणि त्यांना तशी सोय उपलब्ध असेल तर ते प्रॉडक्ट किंवा सेवा खरेदी करण्याची शक्यता जास्त असते, असे आमच्या संशोधनातून दिसून आले आहे.

अर्थात, आम्हाला त्यात आणखी बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही लहानमोठ्या बिझनेसना त्यांची चॅट्स व्यवस्थापित करण्यासाठी WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Business API चा पर्याय देऊ केला आहे. कोणते उपाय लागू पडत आहेत आणि काय पसंतीस उतरते आहे याबद्दलचा फीडबॅक ऐकल्यानंतर, WhatsApp हे ॲप 'मेसेजिंग'ला ग्राहक आणि बिझनेस यांच्यातील संभाषणाचा दुवा बनवू शकते याबद्दल आमची खात्री पटली आहे. यासाठी आम्ही खालील क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढवत आहोत:

  • शॉपिंग - बिझनेसची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पाहण्यासाठी आणि थेट चॅटमधूनच खरेदी करण्याचे अधिकाधिक मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बिझनेसेसला त्यांच्या सद्य कॉमर्स आणि कस्टमर सोल्युशन्समध्ये ही फीचर्स इंटिग्रेट करता यावीत यासाठी सोपे मार्ग उपलब्ध करून देऊ. साथीच्या काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या छोट्या बिझनेसना याचा फायदा होईल.
  • Facebook होस्टिंग सर्व्हिसेस - प्रत्येक बिझनेसच्या तंत्रज्ञानविषयक गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे त्यांना ग्राहकांशी होणारी संभाषणे होस्ट करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे पर्याय हवे असतात. आता रिमोट पद्धतीने होणारे काम वाढल्याने याची अधिकच गरज भासत आहे. हे सर्व पाहता आम्ही येत्या काही महिन्यांमध्ये आमच्या मागील दोन वर्षांमधील बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर्स सोबत भागीदारी वाढवण्याचा आमचा मानस आहे. येत्या काळात Facebook देखील होस्टिंग सर्व्हिसेस देऊ करण्याची योजना आखते आहे. त्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्ही बिझनेसना त्यांचे WhatsApp मेसेजेस व्यवस्थापित करण्याचा नवा पर्याय देणार आहोत. या पर्यायामुळे छोट्या आणि मध्यम आकाराच्या बिझनेसना त्यांचा बिझनेस सुरू करणे, त्यांची प्रॉडक्ट्स विकणे, त्यांची इन्व्हेंटरी अद्ययावत ठेवणे आणि कर्मचारी कुठेही असू देत, बिझनेसला येणाऱ्या मेसेजेसना उत्तर देता येणे सोपे होणार आहे.
  • बिझनेसची विक्री - आमच्या सर्व्हिसेस वापरणाऱ्या बिझनेसेसकडून आम्ही काही शुल्क आकारणार आहोत. २ अब्जांहून अधिक WhatsApp वापरकर्त्यांना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा लाभलेले मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंग विनामूल्य देऊ करण्यासाठी व त्यांना देण्यात येणाऱ्या सेवांचा विस्तार करण्यासाठी आम्हाला हे कामी येईल.

बहुतेक लोक त्यांच्या मित्रमैत्रिणींशी, कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी WhatsApp चा वापर करतात आणि हेच लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी नवनवीन फीचर्स विकसित करत राहू आणि लोकांची खाजगी संभाषणे सुरक्षित ठेऊ.

WhatsApp वरील हे अतिरिक्त अनुभव अनेक लोकांच्या आणि बिझनेसच्या वास्तविक गरजा पूर्ण करतील मग ते जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात असोत असा आमचा विश्वास आहे. आम्ही पुढे काय असेल यासाठी उत्सुक आहोत आणि येत्या काही महिन्यात आम्ही हळूहळू या सर्व्हिस सुरू करू.

२२ ऑक्टोबर २०२०

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)