२३ सप्टेंबर २०२५

१८० हून अधिक देशातील ३ अब्जाहून अधिक युजर्ससह, आम्ही आमच्या युजर्सना निकटपणे जोडण्यासाठी सतत कार्यरत आहोत, ते जगात कुठेही असले तरीही. परंतु आम्ही जाणून आहोत की काही वेळा कामे पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्हाला खरोखर काय वाटते हे व्यक्त करण्यासाठी भाषा एक अडचण ठरू शकते. त्यामुळेच आम्ही WhatsApp वर मेसेज भाषांतरे आणण्यासाठी उत्सुक आहोत, जेणेकरून तुम्ही सर्व भाषांमध्ये सुलभपणे परस्पर संवाद साधू शकाल.
तुम्हाला एखाद्या वेगळ्या भाषेत मेसेज दिसल्यास, तुम्हाला आता फक्त जास्त वेळ दाबून ठेवून ‘भाषांतर करा’ वर टॅप करायचे आहे. तुम्हाला ज्या भाषेमधून किंवा ज्या भाषेमध्ये मेसेजचे भाषांतर करून हवे आहे ती भाषा निवडा आणि भविष्यातील भाषांतरांसाठी सेव्ह करण्याकरिता ते डाउनलोड करा. हे 1:1 चॅट्स, ग्रुप्स आणि चॅनेल अपडेट्स यासाठी उपयुक्त आहे.
Android युजर्सदेखील संपूर्ण चॅट थ्रेडसाठी ऑटोमॅटिक भाषांतर चालू करण्याचा पर्याय निवडू शकतात, जेणेकरून त्या संभाषणातील भविष्यातील सर्व मेसेजेसदेखील भाषांतरीत केले जातील.
मेसेज भाषांतरे तुमच्या चॅट्सच्या गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी डिझाइन केली होती. त्यामुळे WhatsApp भाषांतरे पाहू शकत नाही अशा ठिकाणी तुमच्या डिव्हाइसवर ती केली जातात.
आम्ही आजपासून Android आणि iPhone युजर्ससाठी, सुरुवातीला काही निवडक भाषांमध्ये टप्प्याटप्प्याने मेसेज भाषांतरे सादर करत आहोत, अधिक भाषा लवकरच येतील. Android युजर्सना ते सहा भाषांमध्ये उपलब्ध आहे: इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी, पोर्तुगिज, रशियन आणि अरेबिक. आमच्या iPhone युजर्ससाठी, हे फीचर 19+ भाषांमध्ये लाँच होईल.
या फीचरमुळे भाषेचे अडसर दूर होतील आणि युजर्स त्यांच्या जिवलगांशी आणि जगभरातील कम्युनिटीजशी अधिक सलोख्याने कनेक्ट होऊ शकतील अशी आम्हाला आशा आहे.