आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाकम्युनिटी बील्ड करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी बील्ड करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • WhatsApp वेब
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वरील कम्युनिटीज बाबतची आमची कल्पना तुमच्यासोबत शेअर करत आहोत

आज कम्युनिटीज ही नवीन फीचरबाबतची कल्पना WhatsApp वर जोडताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साल २००९ मध्ये WhatsApp लाँच झाल्यापासून, जेव्हा लोकांना एखाद्या व्यक्तीशी, मित्रांच्या ग्रुपशी किंवा कुटुंबाशी बोलायचे असेल, तेव्हा प्रत्यक्ष भेटीतील संभाषणानंतर दुसरे समाधानकारण संभाषण प्रदान करण्यात आम्ही कशी मदत करू शकू यावर लक्ष केंद्रित केले आहे. कम्युनिटीबरोबर संवाद आणि समन्वय साधण्यासाठी जे लोक WhatsApp वापरत आहेत त्यांची मतेदेखील आम्ही वारंवार जाणून घेत असतो.

शाळा, लोकल क्लब्ज आणि नफा हेतुहीन संस्था यांसारख्या संस्था आता सुरक्षितरित्या संवाद साधण्यासाठी आणि कामे करवून घेण्यासाठी WhatsApp वर अवलंबून राहतात - विशेषतः सार्वत्रिक साथीने जेव्हापासून आपल्या सर्वांना दूर असतानादेखील एकत्र काम करण्याचे अभिनव मार्ग शोधण्यास भाग पाडले, तेव्हापासून. आम्हाला ज्या विपुल प्रमाणात फीडबॅक मिळाला आहे त्यामुळे या कार्यव्यस्त संभाषणांचे व्यवस्थापन करणे लोकांसाठी अधिक सोपे व्हावे म्हणून आम्हाला बरेच काही करता येईल असे वाटते.

येथे कम्युनिटीज मोठी भूमिका बजावू शकतात. WhatsApp वरील कम्युनिटीज लोकांना त्यांच्यासाठी सुयोग्य अशा संरचनेत वेगवेगळे ग्रुप्स एका छताखाली एकत्र आणणे शक्य करतील. त्यामुळे लोकांना संपूर्ण कम्युनिटीला पाठविलेले अपडेट्स मिळवणे आणि छोट्या छोट्या ग्रुप्सना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर चर्चासत्र आयोजित करणे अधिक सोपे होऊ शकेल. कम्युनिटीजकडे ॲडमिनसाठी नवीन प्रभावी टूल्सदेखील असतील ज्यामध्ये प्रत्येकाला पाठविले जाणारे घोषणा मेसेजेस आणि कोणते ग्रुप्स समाविष्ट करायचे यावर नियंत्रण अशा गोष्टींचा समावेश असेल.

शाळेच्या मुख्याध्यापकांना कम्युनिटीजमुळे सर्व पालकांना एकत्र आणून, माहित असणे आवश्यक असे अपडेट्स शेअर करणे, तसेच विशिष्ट वर्ग, अभ्यासेतर उपक्रम किंवा स्वयंसेवकांची गरज यांसारखे ग्रुप्स स्थापन करणे अधिक सुलभ होईल.

WhatsApp वर ग्रुप्स ज्याप्रकारे कार्य करतात त्यामध्ये आम्ही अनेक सुधारणा करत आहोत - मग ते कम्युनिटीचा भाग असोत किंवा नसोत. यामुळे लोकांना गोष्टी शेअर करण्याचे नवीन मार्ग मिळण्यास मदत होईल आणि मोठ्या चॅट्सवरील अतिरिक्त भार कमी होईल असे आम्ही मानतो. कम्युनिटीज तयार होण्याआधीच लोकांना नवीन फीचर्स वापरून बघता यावेत म्हणून हे नवीन फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये सादर केले जातील.

  • प्रतिक्रिया - लोकांना चॅटमध्ये वारंवार नवीन मेसेजेस न टाकताही आपले मत त्वरित मांडता यावे म्हणून WhatsApp वर इमोजी प्रतिक्रिया सादर केल्या जात आहेत.
  • ॲडमिनद्वारे हटवणे - ग्रुप ॲडमिन्स सर्व सदस्यांच्या चॅटमधील चुकीचे किंवा आक्षेपार्ह मेसेजेस काढून टाकण्यास सक्षम असतील.
  • फाइल शेअरिंग – लोकांना प्रोजेक्टमध्ये सुलभतेने सहयोग करता यावा म्हणून २ गिगाबाइट्सपर्यंतच्या फाइल्सना सपोर्ट करण्यासाठी आम्ही फाइल शेअरिंग वाढवत आहोत.
  • अधिक मोठे व्हॉइस कॉल्स – चॅटिंग पेक्षा प्रत्यक्ष बोलणे चांगले वाटत असेल अशा लोकांना आता जास्तीत जास्त ३२ लोकांना व्हॉइस कॉल करणे आम्ही सादर करणार आहोत त्यात पूर्णपणे नवीन डिझाइनचा समावेश आहे आणि जे फक्त एका टॅपने करता येईल.

कम्युनिटीज स्वभावतःच खाजगी आहेत आणि म्हणूनच आम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने मेसेजेस सुरक्षित ठेवत राहू. हे सुरक्षा तंत्रज्ञान लोकांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एकजुटीचे संबंध असलेले ग्रुप्स - शाळा, धार्मिक मेळाव्याचे सदस्य किंवा अगदी बिझनेसेस - सर्वांनाच WhatsApp कडून प्रत्येक शब्दाचे मॉनिटरिंग न केले जाता, सुरक्षित आणि खाजगी संभाषणे करता येण्याची अपेक्षा आणि गरज आहे. कम्युनिटीजची गोपनीयता, सुरक्षितता आणि सुरक्षा आम्ही कशाप्रकारे हाताळणार आहोत याबद्दल here येथे अधिक जाणून घ्या.

इतर ॲप्स शेकडो आणि हजारो लोकांच्या चॅट्सची निर्मिती करत असताना, आम्ही जे ग्रुप्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत, त्या ग्रुप्सना सपोर्ट करण्यावर लक्ष केंद्रित करणे पसंत करत आहोत. WhatsApp वर कम्युनिटीज ही नवीन गोष्ट आहे आणि पुढील काही वर्षे त्यांना सपोर्ट करण्यासाठी नवनवीन फीचर्स सादर करण्यावर आमचे लक्ष सर्वाधिक केंद्रित झालेले असेल. कम्युनिटीज तुमच्या हातात देण्यास आणि तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

एप्रिल १४, २०२२

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रडाउनलोड करासुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण