17 नोव्हेंबर 2022
लोकांना WhatsApp वर एखादा बिझनेस शोधण्यात, मेसेज करण्यात किंवा तेथून एखादी वस्तू खरेदी करण्यात मदत करण्यासाठी आम्ही जे तयार करतो आहोत त्याबद्दल एक अपडेट आम्ही आज शेअर करत आहोत. आज आमचा कार्यसंघ ब्राझीलमध्ये आहे जिथे आम्ही संपूर्ण खरेदी अनुभव थेट WhatsApp चॅटवर आणण्याच्या आमच्या उद्दिष्टावर चर्चा करत आहोत.
लोकांना WhatsApp वर आधीपासून असलेल्या लक्षावधी लहान बिझनेसकडून आणि हजारो ब्रॅंडकडून त्वरित मदत मिळवण्याचा सोयीस्कर मार्ग हवा आहे. आज आम्ही थेट WhatsApp वर बिझनेस शोधण्याची क्षमता लॉंच करत आहोत त्यामुळे लोक श्रेणीनुसार बिझनेस ब्राउझ करू शकतात – जसे की प्रवास किंवा बॅंकिंग – किंवा बिझनेसच्या नावानुसार शोधणे. यामुळे लोकांना वेबसाइइटबाहेर फोन नंबर शोधावे लागणार नाहीत किंवा त्यांच्या संपर्कांमध्ये नंबर टाइप करावा लागणार नाही.
आम्ही व्यवसाय शोध अशा प्रकारे तयार केला आहे की ज्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचे संरक्षण केले जाते. तुम्ही जे शोधता ते त्यावर अशा प्रकारे प्रक्रिया केली जाते ते परत तुमच्या खात्याशी लिंक केले जाऊ शकत नाही. प्रारंभ करण्यासाठी, आम्ही बिझनेस शोधण्याची क्षमता ब्राझील, इंडोनेशिया, मेक्सिको आणि युकेमध्ये आणत आहोत जिथे लोक आमच्या WhatsApp Business प्लॅटफॉर्मचा वापर करून कंपन्या शोधू शकतात. ब्राझीलमध्ये, शोधमुळे लोकांना लहान बिझनेसदेखील शोधण्यात मदत होईल.
अधिकाधिक बिझनेस WhatsApp वापरत असल्यामुळे, आमचे पहिले तत्त्व हे लोकांना त्यांच्या संभाषणावर नियंत्रण मिळवून देणे हे आहे. हे योग्य करून घेणे आमच्यावर विश्वास ठेवणार्या लोकांसाठी आणि बिझनेससाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे WhatsApp साठी आहे. WhatsApp मध्ये सामील झालेले अलीकडील काही बिझनेस लोकांना बॅंक खाते उघडण्यात, त्यांचे मेट्रोचे तिकीट खरेदी करण्यात आणि किराणासामानाची ऑर्डर देण्यात मदत करत आहेत.
अखेरीस आम्ही इच्छितो की लोकांना थेट त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डसोबतच्या चॅटद्वारे सुरक्षित पेमेंट करता यावे. आम्ही अलीकडे launched this experience in India आणि याची चाचणी ब्राझीलमध्ये अनेक पेमेंट भागीदारांसोबत होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे. जे लोक आणि बिझनेस वेबसाइटवर न जाता, अन्य ॲप न उघडता किंवा प्रत्यक्षपणे पैसे न देता WhatsApp वर खरेदी आणि विक्री करू इच्छित आहेत अशा लोकांसाठी आणि बिझनेससाठी हा अखंड चेकआऊट अनुभव लक्षणीय परिवर्तन करणारा असेल.
हे नवीन अनुभव WhatsApp ला लोकांना त्यांच्या आवडीच्या बिझनेसशी कनेक्ट करण्याचा उत्तम मार्ग बनवण्याचा एक भाग आहेत. आम्ही तुमच्या अभिप्रायाची प्रतीक्षा करत आहोत.