आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाकम्युनिटी बील्ड करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी बील्ड करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • WhatsApp वेब
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

सर्व आकारमानाच्या बिझनेससाठी WhatsApp वर प्रारंभ करणे सोपे करणे

जगभरातील लोकांसाठी आणि बिझनेससाठी, WhatsApp आता बिझनेस पूर्णपणे करता येईल असे ठिकाण झाले आहे. आई-आणि-बाबांसाठी असलेले दुकान असो किंवा Fortune ५०० कंपनी असो, सर्व प्रकारचे बिझनेस आज त्यांच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी WhatsApp वर अवलंबून आहेत.

ज्या प्रकारे WhatsApp ने प्रियजनांना सीमा ओलांडून मुक्तपणे संवाद साधणे शक्य केले आहे त्याच प्रकारे बिझनेसशी बोलताना आम्ही सर्वांनी अनुभवलेली आव्हाने आम्ही इतिहासजमा करू इच्छितो. याचा अर्थ आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार नाही, अर्धवट वेबसाइटवर अडकून राहावे लागणार नाही किंवा पाठवलेला ईमेल ब्लॅक बॉक्समध्ये गेल्यास तो कधी वाचला जाईल का याचे आश्चर्य वाटणार नाही.

आजच्या तारखेला, आम्ही लाखो बिझनेसना WhatsApp द्वारे सर्वोत्तम बनवण्यात मदत केली आहे. पुढील पायरी म्हणजे ज्यांना जलद, सोयीच्या आणि विश्वसनीय मार्गाने त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधायचा आहे त्या प्रत्येक बिझनेससाठी WhatsApp उपलब्ध करणे.

नवीन क्लाउड-आधारीत API सह सर्व बिझनेस आणि विकासकांसाठी WhatsApp खुले करणे

आज आम्ही Meta ने प्रदान केलेल्या विनामूल्‍य, सुरक्षित क्लाउड होस्टिंग सर्व्हिसेसद्वारे संपूर्ण जगभरात कोणत्याही आकारमानाच्या कोणत्याही बिझनेससाठी WhatsApp उपलब्ध करून देऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. या नवीन API सह, आम्ही स्टार्ट-अपचा काळ काही महिन्यांपासून काही मिनिटे इतका कमी केला आहे जेणे करून बिझनेस आणि विकासक आमची सर्व्हिस जलद आणि सहज ॲक्सेस करू शकतील, त्यांचा अनुभव अधिक सानुकूलित करण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांना प्रतिसाद देण्याचा वेग वाढवण्यासाठी थेट WhatsApp वर निर्मिती करू शकतील. या सर्व्हिसेस आमच्या भागीदारांसाठी महागड्या सर्व्हरसाठी होणारे खर्च देखील काढून टाकतील आणि त्यांना नवीन फीचरचा त्वरित ॲक्सेस देतील. बिझनेस सुरू होण्यासाठी ते थेट साइन अप करू शकतात किंवा आमच्या बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर पैकी एकासह कार्य करू शकतात.

जलद वाढणाऱ्या बिझनेससाठी WhatsApp Business ॲपमधील नवीन फीचर

WhatsApp वापरणारे लहान बिझनेस कसे वाढतील याकडे गेल्या काही वर्षांत आम्ही लक्ष पुरवले आहे आणि आम्ही त्यांना जास्तीचे टूल देऊन सपोर्ट करू इच्छितो. आम्ही अपेक्षा करतो की काहींना क्लाउड-आधारित API वापरण्याची इच्छा असेल परंतु बरेच जण WhatsApp Business ॲप वापरणे चालू ठेवतील. आम्ही या बिझनेससाठी प्रगत फीचरवर देखील कार्य करत आहोत जेणे करुन त्यांना फक्त काही लोकांऐवजी अनेकांपर्यंत पोहोचण्यात आणि त्यांचा ब्रँड ऑनलाइन वाढवण्यात मदत होईल - जसे की १० डिव्हाइसेसपर्यंत चॅट व्यवस्थापित करण्याची क्षमता ज्यामुळे ते चॅटचा प्रवाह अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतील. बिझनेसना त्यांच्या ऑनलाइन प्रेझेन्सवर ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही नवीन कस्टम WhatsApp क्लिक-टू-चॅट लिंक देखील प्रदान करू. नवीन प्रीमियम सर्व्हिसचा भाग म्हणून WhatsApp Business ॲपमध्ये शुल्क आकारून हे अतिरिक्त, पर्यायी फीचर ऑफर करण्याचा आमची योजना आहे. आम्ही याची अधिक माहिती लवकरच शेअर करू.

बिझनेसना सपोर्ट करण्यासाठीच्या या नवीन मार्गांसह, व्यक्ती-ते बिझनेस संभाषणांसाठी आमची मूल्ये अद्याप बदललेली नाहीत. लोक ज्या बिझनेसशी चॅट करतात त्यांचे नियंत्रण लोकांकडे असते आणि त्यांनी संपर्क साधण्याची विनंती केल्याशिवाय बिझनेस लोकांना मेसेज पाठवू शकत नाहीत.

आम्हाला आशा आहे की लोकांना WhatsApp वर त्यांच्या आवडत्या बिझनेसशी चॅट करण्याची क्षमता आवडेल आणि नवीन बिझनेस कसे तयार होतात, वाढतात आणि भरभराट होतात हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

१९ मे, २०२२

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रडाउनलोड करासुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण